08/09/2018
*ड्रायव्हरचा प्रश्न*
मी एक *ड्रायव्हर* असून मला पडलेला एकच प्रश्नच ?
आपण आपल्या देशात सैनिकाला खूप सन्मान देतो कारण ते आपल्या जिवावर उदार होऊन आपले रक्षन करतात आणि आम्ही पण आपल्या जिवावर उदार होऊन तुम्हाला लागनारी प्रत्येक वस्तू तुमच्या पर्यंत पोहचवतो मग आम्हाला एवढा *तिरस्कार* का सहन करावा लागतो, *बस चालक* आपले काम खूप इमानदारीने करतात, तरी एखादा मोटर सायकल वाला त्याच्याशी भांडतो. *ट्रक ड्रायव्हर* शी लोकांना वाद घालायला लोकांना खुप आवडते, पण आपण हा विचार कधीही करत नाही की कुठलाही *ड्रायव्हर* स्वतावरून कोणताही अपघात करत नाही कारण त्याच्या मागे त्याच्या परिवार घरी वाट पाहत असतो, प्रत्येक *ड्रायव्हर* हा आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडतो, तुम्ही जसे नोकरी करता तसेच तोही नोकरी करतो फरक हा आहे आपल्या मनात आपन ठरवून टाकले की *ड्रायव्हर* हा वाईट असा व्यक्ती असतो याच कारणामुळे आपण असे वागत असाल असे मला तरी वाटते, आपण जर कोणाची मदत करू शकत नाही तर त्याला त्रास होईल असे वागू नका, मी देवाला प्रार्थना करील की आमच्या वर येणारे प्रसंग कधी तूमच्यावर येऊ नये, सैनिक सीमेवर असताना त्यांना रसद पोचवण्याचे काम एक *ड्रायव्हरच* करतो. एका पेशंटचे प्राण वाचले पाहिजे म्हणून गाडी वेगात चालविणारा एक *ड्रायव्हरच* असतो, बस मध्ये प्रवास करणारे प्रवासी हे सर्व काही त्या *ड्रायव्हर /कंडक्टर* चे नातेवाईक नसतात तरी पण ते सुरक्षित घरी पोहोचले पाहिजे ही जबाबदारी पार पाडणार एक *ड्रायव्हरच* असतो, हे सर्व होत असताना आपण नाहक त्यांच्याशी वाद घालणे, मारहाण करणे हे कधीतरी बंद करणार की नाही ? अरे मित्रांनो सैनिकाला जीव वाचवण्यासाठी व दुश्मनाचा मुकाबला करण्यासाठी बंदूक दिली जाते, पण आमचे दुर्दैव पाहा आम्ही ज्या लोकांना सेवा करतो तेच आमच्या जीवावर उठलेले असतात .
म्हणून आपणांस विनंती आहे की ड्रायव्हर सुद्धा आपल्या तील एक माणूस च आहे फक्त आमच्या शी सौजन्याने वागा !
*आपला ऐक ड्रायव्हर*
आवडले तर नक्की शेअर करा, ही विनंती,