M7News Maharashtra

M7News Maharashtra not only

https://youtube.com/
https://www.instagram.com/m7newsmaharashtra
आम्ही सर्वच क्षेत्रात youtube Insta facebook या OPEN PLATFORM वरून माहिती आणि बातम्या प्रसारित करत असतो,

26/07/2026

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्याकडून ब्रेक....?मी महाराष्ट्रातच राहणार ....!

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांच्याकडे दिल्लीत मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, "मी आज नागपुरात आहे आणि संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. मी महाराष्ट्रातच राहणार आहे," असे सांगत त्यांनी या चर्चा फेटाळल्या.

26/07/2026

केज मध्ये विविध उपक्रम आणि शिबिरे.....?

राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त (२६ जुलै) केज विधानसभा मतदारसंघामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप पदाधिकारी डॉ. वासुदेव नेहरकर,महादेव सूर्यवंशी, डॉ.योगिनी ताई थोरात इतर कार्यकर्ते आणि समर्थकांच्या वतीने विविध सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.केज मतदारसंघातील विविध प्रमुख गावांमध्ये आणि शहरांमध्ये तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून शालेय साहित्याचे वाटप वृक्ष लागवड कार्यमाचे आयोजन व शहरात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

#पंकजामुंडे #पंकजाताई_मुंडे #पशुसंवर्धनमंत्री #पर्यावरणमंत्री

मोठी बातमी! धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांचा मोठा विजय!
25/07/2026

मोठी बातमी!
धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांचा मोठा विजय!

25/07/2026

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आज, २५ जुलै २०२६ पत्रकार परिषद Pune
सर्व निवडून आलेले खासदार हे रडारवर...!

राजीनाम्याची मागणी दिल्ली सेंटर असावे...?

25/07/2026

पंढरपुरातून थेट: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोकठोक माध्यम संवाद!

"आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील जनतेसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.पेपर लीक प्रकरणांवर भाष्य करताना, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

25/07/2026

मानाचे वारकरी ठरले 'माने' दाम्पत्य....!
यंदा मान धाराशिव जिल्ह्याला

देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे २:३० वाजता पारंपरिक विधींनुसार शासकीय महापूजा संपन्न झाली.गेल्या २० वर्षांपासून नियमित पायी वारी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावचे शेतकरी दाम्पत्य श्री. बाबासाहेब माधव माने (वय ७०) व सौ. प्रभावती बाबासाहेब माने (वय ६८) यांना यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा सुवर्णक्षण लाभला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

यंदाचा महापूजेचा मान धाराशिवच्या 'माने' दाम्पत्याला!आषाढी एकादशी विशेष वृत्त:पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या...
25/07/2026

यंदाचा महापूजेचा मान धाराशिवच्या 'माने' दाम्पत्याला!
आषाढी एकादशी विशेष वृत्त:
पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे संपन्न! यंदा महापूजेचा मानाचा वारकरी ठरण्याचा बहुमान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी दाम्पत्य श्री. बाबासाहेब माधव माने आणि सौ. प्रभावती माने यांना मिळाला. विठू माऊली सर्वांना सुखी ठेवो, हीच प्रार्थना! 🙏🚩

24/07/2026

चौक लहान केले, पण रस्त्यांवरील अतिक्रमित गाड्यांचे काय?
केज
अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी चौक काढा मात्र अतिक्रमण तसेच ठेवा एक वेगळीच शक्कल,
रस्त्यांवरील वाढती अतिक्रमणे, अनधिकृत गाडे आणि बेशिस्त पार्किंग यांमुळे सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना रोज नाहक त्रास सहन करावा लागतो. याला आळा घालण्यापेक्षा चौकाचे बांधकाम पाडून चौक कमी करण्याची युक्ती आज पाहायला मिळाली....!

योग्य की अयोग्य यावर आपलं मत व्यक्त करा.

24/07/2026

पंढरपुरातून मोठी घोषणा: १७ लाख शेतकऱ्यांना ₹१३,००० कोटी!३१ जुलैपूर्वी खात्यात पैसे....?

पंढरपूरच्या पावन भूमीतून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घोषणा केली आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या' पहिल्या यादीतील १७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १३,००० कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे!३१ जुलैपर्यंत हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे.

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना #कर्जमुक्ती२०२६ #बळीराजा

मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केजमध्ये विविध सामाजिक उपक्रमलघुरुद्राभिषेक, वृक्षारोपण व भव्य रक्तदान शि...
24/07/2026

मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केजमध्ये विविध सामाजिक उपक्रम

लघुरुद्राभिषेक, वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे डॉ. योगिनी थोरात व सुरेंद्र काका तपसे यांचे आवाहन

केज : सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मा. ना. पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुक्यात रविवार, दि. २६ जुलै रोजी लघुरुद्राभिषेक, वृक्षारोपण आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगिनी थोरात व माजी पंचायत समिती सभापती सुरेंद्र काका तपसे यांनी केले आहे.
पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. २६) केज तालुक्यात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सकाळी ८ वाजता तांबवा येथील श्री तांबेश्वर मंदिरात लघुरुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता गणपती मंदिर, धारूर रोड, केज येथे वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता ईशान हेल्थ केअर सेंटर, डॉ. योगिनी थोरात (जयभाये), जय भवानी चौक, केज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या विविध उपक्रमांच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच पर्यावरण संवर्धन आणि रक्तदानासारख्या समाजोपयोगी कार्याला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगिनी थोरात व सुरेंद्र काका तपसे यांनी केले आहे.

#पंकजामुंडे #पंकजाताई_मुंडे #पशुसंवर्धनमंत्री #पर्यावरणमंत्री

Address

Kaij

Telephone

+919075600707

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M7News Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to M7News Maharashtra:

Shortcuts

Share