16/08/2026
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची नवीन राजवाड्यात खासदार शाहू छत्रपती महाराजांची सदिच्छा भेट
भारताचे माजी सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांनी कोल्हापूर येथील नवीन राजवाड्यात खासदार श्री. शाहू छत्रपती महाराज यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी खासदार श्री. शाहू छत्रपती महाराज, श्री. मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरीमाराजे छत्रपती आणि यशराजराजे छत्रपती यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी न्यायाधीश सुनील तावडे, ॲड. संग्राम देसाई, ॲड. श्रीकृष्ण गणबावले, ॲड. आर. एल. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीत विविध विषयांवर स्नेहपूर्ण संवाद साधण्यात आला.