24/01/2021
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्ताने एअर इंडिया मधील आजी आणि माजी शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे चाहते त्यांना अभिवादन करण्यासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या जुना विमानतळ येथील कार्यालयात शुक्रवार दि २२ जानेवारी रोजी सकाळी ११-०० वाजतां जमले होते.
एअर इंडिया मेडिकल सर्व्हिसेस चे विभागीय महासंचालक डाॅ तुरबाडकर यांनी सर्वप्रथम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
याप्रसंगी एअर इंडियाचे मेडिकल ऑफिसर डाॅ मकरंद सोलगे, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे माजी उपाध्यक्ष दिलीप पिंगे, ज्येष्ठ शिवसैनिक आणि एस बॅकेचे माजी उपाध्यक्ष डी एस पवार, एस बॅकेचे संचालक शैलेश पेडणेकर, प्रशांत कडू, प्रताप बंडगर, माजी संचालक प्रशांत सावंत, सुचिता प्रधान, कन्झ्युमर सोसायटीचे संचालक महादेव देसाई, स्थानीय लोकाधिकार समितीचे चिटणीस अजित चव्हाण, महिला आघाडीच्या गीता गुरव, ज्येष्ठ शिवसैनिक डॅरिल सुतारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिक विनायक वाईरकर यांना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने शाल व श्रीफळ देण्यात आले.
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे -----