RarePath

RarePath RarePath is Travel and Tourism Company. We arrange tours of unexplored, lessknown, offbeat destinations. Our motto is to take you on RarePaths.

Our slogan is 'Travel beyond Thoroughfare'. All Travel lovers, wonderers, explorers are invited.

*रेअरपाथ*आयोजितनेहमीप्रमाणे एकदम हटके एकदिवसीय सहल*पारनेर वारसा स्थळ भटकंती**रविवार, दि. 14 डिसेंबर 2025* रोजीनगर जिल्ह्...
03/12/2025

*रेअरपाथ*
आयोजित
नेहमीप्रमाणे एकदम हटके एकदिवसीय सहल
*पारनेर वारसा स्थळ भटकंती*
*रविवार, दि. 14 डिसेंबर 2025* रोजी
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा ऐतिहासिक तसेच नैसर्गिक वारसा लाभलेला भू भाग आहे.
या सहलीत आपण तज्ञ मार्गदर्शकांबरोबर जाणून घेणार आहोत खालील वारसा स्थळे
- टाकळी ढोकेश्वर लेणी
- ऐतिहासिक पळशी गाव
- विठ्ठल मंदिर, पळशी
- महादजी शिंदे भुईकोट, जामगाव
- पारनेर येथील चालुक्यकालीन मंदिरे

*टूर शुल्क* : ~2000~ ₹1800 प्रति व्यक्ति

*सामाविष्ट* :
- नाशिक ते नाशिक प्रवास
- सकाळचा चहा-नाष्टा
- दुपारचे जेवण
- संध्याकाळचा चहा
- तज्ञ, गाईड फी
*सामाविष्ट नसलेले* :
- पाणी बाटली
- कॅमेरा फी, वैयक्तिक खरेदी
- सामाविष्ट यादी व्यतिरिक्त

◻️सुंदर अशा वारसास्थळांनी समृद्ध असा हा आगळा भाग बघण्यासाठी एका बॅचमध्ये मोजके सीट असणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्वरा करावी लागेल...

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क
8483826689
9422258058
9209754054

Happy Diwali to All Travel lovers... Keep Travelling, Happy Traveling!!
21/10/2025

Happy Diwali to All Travel lovers... Keep Travelling, Happy Traveling!!

🔹 _सोशल मिडियावर तंजावूर, बृहद्देश्वर मंदिर, चोळ साम्राज्य याबाबतीतले खूप व्हिडिओज् आपण बघतअसतो. त्यात अनेक आश्चर्यकारक ...
16/10/2025

🔹 _सोशल मिडियावर तंजावूर, बृहद्देश्वर मंदिर, चोळ साम्राज्य याबाबतीतले खूप व्हिडिओज् आपण बघतअसतो. त्यात अनेक आश्चर्यकारक बाबी उलगडून दाखवलेल्या असतात. त्यामुळे आपल्या मनात तिथे भेट देण्याची भावना नक्कीच तयार होते. आपलं कुतुहल असंच जागृत ठेवा आणि चला..._
*रेअरपाथ*
आयोजित
🔹 *चोळ साम्राज्यातील जगप्रसिद्ध मंदिरांची सफर*
दि. 4 ते 8 डिसेंबर 2025
(4 रात्र/5 दिवस)
🔹 *टूर मध्ये दाखविली जाणारी स्थळे*
🔸 युनेस्को जागतिक वारसा असलेली तीन मंदिरे
🔸 याव्यतिरिक्त चोळ राजांनी बांधलेली आणि इतर भव्य मंदिरे
🔸 दोन हजार वर्षांपूर्वी कावेरी नदीवर बांधलेले कल्याणी धरण
🔸 मंदिरांचे शहर कुंभकोणम
🔸 गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे निवास स्मारक
🔸 भारतातील एकमेव डॅनिश किल्ला
🔸 पूर्व समुद्र तट दर्शन आणि मुक्काम
🔸 जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खारफुटी जंगलात बोट सफर
आणि बरंच काही

🔹 अधिक माहितीसाठी संपर्क -
9422258058
8483826689
9209754054

🔹 _अनेक प्रवासप्रेमी मंडळींनी टूर जाहिर होण्याच्या आतच नावे देऊन ठेवली आहेत. आपणही त्वरा करावी_

अजूनही आपली ही जगप्रसिद्ध स्थळं बघायची राहून गेली आहे का?मग रेअरपाथ आयोजित मध्यप्रदेश वारसा टूर, जी सर्व प्रवासप्रेमींमध...
16/10/2025

अजूनही आपली ही जगप्रसिद्ध स्थळं बघायची राहून गेली आहे का?

मग रेअरपाथ आयोजित मध्यप्रदेश वारसा टूर, जी सर्व प्रवासप्रेमींमध्ये खास प्रसिद्ध झालेली आहे, यात नक्की सहभागी व्हायला हवे...

आपण शालेय पुस्तकांमधून साँचीचे स्तूप, भीमबेटकाची शैलाश्रये, खजुराहोची मंदिरं आदी शिकलेलो आहे...
टि.व्ही. वर लागणाऱ्या मध्यप्रदेश पर्यटन विभागाच्या कल्पक जाहिराती देखिल मनात घर करून जातात...
आपल्या बकेट लिस्टमध्ये ही स्थळं लिहीली जातात...

चला तर मग...

*रेअरपाथ* आयोजित *मध्यप्रदेश वारसा सहल*

🔹 *दि. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2025*

*या टूरमध्ये दाखवली जाणारी युनेस्को जागतीक वारसा स्थळे* -
🔸 भीमबेटका - लाखो वर्षांपूर्वीच्या गुहा ज्यात आदीमानव अस्तित्वाच्या खूणा आहेत
🔸 सांची - मौर्य कालीन भव्यदिव्य बौद्ध स्तुपांचा परिसर
🔸 खजुराहो - भारतीय शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेली मंदिरे

*इतर महत्वाचे स्थलदर्शन*
🔸 तलावांचे शहर भोपाळ दर्शन
🔸 भव्य भोजपूर शिवमंंदिर
🔸 भारतातील प्राचीनतम उदयगिरी लेणी
🔸 ग्रीक दूत हेलिओडोरस याचा वैष्णव धर्मात प्रवेशाप्रित्यर्थ दोन हजार वर्षापूर्वी उभारलेला स्तंभ
🔸 विदिशा शहर दर्शन
🔸 रानेह धबधबा, कॅन्योन दरी, खजुराहो

🔹 अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क -
9422258058
8483826689
9209754054

*हैदराबाद*काकतीय राजघराण्यापासून ते कुतुबशाही पर्यंतच्या खूणा असलेले एक ऐतिहासिक शहर*रेअरपाथ* घेऊन आले आहे हैदराबादचा एक...
16/10/2025

*हैदराबाद*
काकतीय राजघराण्यापासून ते कुतुबशाही पर्यंतच्या खूणा असलेले एक ऐतिहासिक शहर
*रेअरपाथ* घेऊन आले आहे हैदराबादचा एक परिपूर्ण टूर...
ज्यात आहे जागतिक वारसास्थळ, धार्मिक स्थळ ज्योतिर्लिंग आणि चित्रनगरी सारखे आनंददायी स्थळे...
पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांच्या पसंतीचे असलेले हे ठिकाण... चला एकाच भेटीत सर्व परिसर नीट व्यवस्थित बघू या !!
टूर: 6 रात्र/7 दिवस
*9 ते 15 नोव्हेंबर 2025*
हैदराबाद ते हैदराबाद

भेट देण्याची स्थळं:
- हैदराबाद शहरातील चारमिनार, गोवळकोंडा सकट सर्व प्रसिद्ध स्थळे
- सालारजंग संग्रहालय
- वारंगळ: सहस्त्र स्तंभ मंदिर, भद्रकाली मंदिर, वारंगळ किल्ला
- जागतिक वारसा स्थळ असलेले *रामप्पा मंदिर*
- लखनावरम जलाशय
- यादगिरी येथील लक्ष्मीनृसिंह मंदिर
- सुवर्णगिरी मंदिर
- रामोजी फिल्म सिटी (पूर्ण दिवस)
- ज्योतिर्लिंग श्री शैलम दर्शन
- स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी
आणि बरंच काही...

नेहमी प्रमाणे 3/4 स्टार हॉटेल एसी रूम, एसी गाडी आणि भोजनाची उत्तम व्यवस्था असणारच आहे...

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क:
9422258058
8483826689
9209754054

जिथे मराठ्यांचे रक्त सांडले त्या काला आम (आंबा) येथे आज भेटीचा योग आला.पानिपतमध्ये तीन ऐतिहासिक लढाया झाल्या ज्यांनी देश...
08/08/2025

जिथे मराठ्यांचे रक्त सांडले त्या काला आम (आंबा) येथे आज भेटीचा योग आला.

पानिपतमध्ये तीन ऐतिहासिक लढाया झाल्या ज्यांनी देश बदलून टाकला. पानिपतमध्ये काला आम हे ऐतिहासिक स्थळ आहे, जे पानिपतच्या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या युद्धाशी जोडलेले आहे. येथील लाल दिसणारी जमीन लाखो सैनिकांच्या रक्तामूळे लाल झालेली आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

इ.स. १७६१ मध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये तिसरे युद्ध झाले तेव्हा ते याच ठिकाणी लढले गेले होते. आता जिथे हे युद्ध स्मारक बांधले आहे, तिथे एक मोठे आंब्याचे झाड होते.

इतिहासकारांच्या मते, जेव्हा अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले तेव्हा या युद्धात सुमारे ७०,००० सैनिक मृत्युमुखी पडले आणि या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचे रक्त येथे जमा होऊ लागले. जेव्हा त्यांचे रक्त या झाडाच्या मुळांमध्ये जमा झाले तेव्हा या झाडावर उगवणारी फळेही काळी पडली, त्याचे लाकूडही काळे झाले.

युद्धानंतर ते झाड हळूहळू सुकू लागले. असे मानले जाते की त्या झाडाने जमिनीतील रक्त शोषले, ज्यामुळे ते तोडल्यावर रक्तासारखे पदार्थ बाहेर पडू लागले. झाड सुकल्यानंतर, शेजारच्या उग्रा खेडी गावातील कवी पंडित शगुन चंद यांनी ते विकत घेतले. त्याच्या लाकडापासून दोन चौकटी आणि दरवाजे बनवण्यात आले.

त्यांनी एक दरवाजा राणी व्हिक्टोरियाला भेट दिला. जो आता पानिपतच्या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे आणि दुसरा दरवाजा करनाल सचिवालयाच्या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

जयपूर येथील टूरीजम कॉन्फरन्स येथे *रेअरपाथ* ला गौरवण्यात आले.वारसास्थळे अर्थात Heritage tourism मध्ये काम करत असल्याबद्द...
05/08/2025

जयपूर येथील टूरीजम कॉन्फरन्स येथे *रेअरपाथ* ला गौरवण्यात आले.
वारसास्थळे अर्थात Heritage tourism मध्ये काम करत असल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी राजस्थान पर्यटन विभागाचे सह संचालक श्री. दिलीप सिंह राठोड उपस्थित होते.


🛕 एलिफंटा लेणी – घारापुरी बेटावरचे अद्वितीय शिल्पसौंदर्य 🌊मुंबईपासून काही अंतरावर, अरबी समुद्रातील शांत बेटावर विसावलेल्...
01/08/2025

🛕 एलिफंटा लेणी – घारापुरी बेटावरचे अद्वितीय शिल्पसौंदर्य 🌊

मुंबईपासून काही अंतरावर, अरबी समुद्रातील शांत बेटावर विसावलेल्या एलिफंटा लेणी, म्हणजेच घारापुरी लेणी, हे भारतीय शिल्पकलेचे जिवंत दगडी रूप आहे.

इ.स.च्या ५व्या-६व्या शतकात खोदलेल्या या लेण्या, शैव पंथाच्या भक्तीसंपन्न कलेचे प्रतीक आहेत. मुख्य गुहा म्हणजेच गुहा क्र. १, ही स्थापत्य आणि शिल्पकलेचा अद्वितीय संगम आहे. २७ मीटर चौरस भागात विस्तारित आणि सहा स्तंभावर उभी असलेली ही गुहा, तिच्या मध्यभागी असलेल्या ७ मीटर उंच ‘त्रिमुखी सदाशिव’ शिल्पामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

🔱 या मूर्तीत दिसतात – 🔸 भैरव (विनाशक) – डावीकडे
🔸 महादेव (संवर्धक) – मध्यभागी
🔸 उमा/वामदेव (सृजनकर्ता) – उजवीकडे

त्याशिवाय येथे अर्धनारीश्वर, नटराज, गंगाधर, अंधकासुरवध, व रावणनुग्रह अशा अनेक शिवमूर्तींच्या विविध भावमुद्राही कोरलेल्या आहेत – ज्या त्यांच्या भावार्थ, आकार, सौंदर्य व संयोजनासाठी अद्वितीय ठरतात.

📜 हे स्थळ युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले असून, हे केवळ पर्यटन स्थळ नसून, एक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे.

📍घारापुरी म्हणजेच 'गुहांचे शहर' – इतिहासात रमण्याची आणि भारतीय कलासंपदेचा अनुभव घेण्याची जागा.

*रेअर पाथ घारापुरी लेणी ची एकदिवसीय सहल तज्ञांसोबत आयोजित करते...

#एलिफंटा #घारापुरीलेणी #भारतीयवारसा #शिल्पकला #भारतीयइतिहास #महाराष्ट्रदर्शन #शिवभक्त

श्रावण मासारंभ, महादेवांची हटके व सुंदर १२ शिवमंदिर आणि रेअरपाथ परिवाराचा भरभरून प्रतिसाद 😊🙏🏼😇🕉️
27/07/2025

श्रावण मासारंभ, महादेवांची हटके व सुंदर १२ शिवमंदिर आणि रेअरपाथ परिवाराचा भरभरून प्रतिसाद 😊🙏🏼😇🕉️

*रेअरपाथ*आयोजितएक दिवसीय पावसाळी निसर्ग सहल*भंडारदरा*▫️ *शनिवार, दि. 12 जुलै 2025* रोजी▫️ भंडारदरा धरण▫️ रंधा धबधबा, वसु...
07/07/2025

*रेअरपाथ*
आयोजित
एक दिवसीय पावसाळी निसर्ग सहल
*भंडारदरा*

▫️ *शनिवार, दि. 12 जुलै 2025* रोजी

▫️ भंडारदरा धरण
▫️ रंधा धबधबा, वसुंधरा धबधबा, नेकलेस धबधबा, कोळटेंभे धबधबा असे 8 ते 9 नयनरम्य धबधबे
▫️ रतनवाडी येथीस अमृतेश्वर मंदिर आणि प्राचीन पुष्करिणी
▫️ सह्याद्री पर्वतरांगा, जंगल, आर्थर जलाशय यांचा नैसर्गिक नजारा

*टूर शुल्क ~₹१७००~ ₹१६२० प्रतिव्यक्ती*

*टूर शुल्कात सामाविष्ट*
▫️ नाशिक ते नाशिक प्रवास (टेम्पो ट्रॅव्हलरने)
▫️ सकाळी चहा, नाष्टा
▫️ दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा
▫️ अनुभवी मार्गदर्शक
▫️ प्रथमोपचार पेटी उपलब्धता

▫️ *ऑनलाईन पेमेंटसाठी*
Account Name - *Rare Path*
Current A/c no. 40036879376
IFSC - SBIN0018050
Branch - Ravivar Karanja, Nashik

▫️ अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क -
9422258058
8483826689
8329677471

▫️ पावसाळी पर्यटन स्थळदर्शन असल्याने प्रवासप्रेमींचा चांगला प्रतिसाद असतो. आपणही त्वरा करा!
धन्यवाद.

सर्व प्रवासप्रेमी मंडळींना नमस्कार,रेअरपाथ एका दिवसापासून ते अनेक दिवसांपर्यतच्या सहलींचे आयोजन करत असते. नावाप्रमाणेच व...
02/07/2025

सर्व प्रवासप्रेमी मंडळींना नमस्कार,
रेअरपाथ एका दिवसापासून ते अनेक दिवसांपर्यतच्या सहलींचे आयोजन करत असते. नावाप्रमाणेच वेगळी वाट धुंडाळत सहलींची स्थळं हटके असतात. काही सहली प्रसिद्ध आणि परिचयाच्या असल्या तरी त्या स्थळाजवळचे हटके ठिकाण आणि माहिती नसलेल्या गोष्टी अभ्यासपूर्ण पद्धतीने समजावून दिल्या जातात.

राहण्या-खाण्याची उत्तम सोय आणि बारकाईने केलेले मार्गदर्शन ही रेअरपाथच्या खासियत आहे.

आतापर्यंत शेकडो प्रवास प्रेमींनी रेअरपाथ सोबतीने अनेक टूर केलेल्या आहेत किंबहूना ते सर्व रेअरपाथचा जणू एक परिवारच बनले आहेत...

आता या वर्षीही भरपूर सहलींचे नियोजन केलंय... नावीन्यपू्र्ण आणि अधिक उत्तम सोयी असलेल्या सहली सर्वांना नक्कीच आनंददायी ठरतील याची खात्री वाटते.

आपण सर्वांनी रेअरपाथ ला दिलेला पाठिंबा, प्रेम आणि विश्वास असाच दृढ राहो.

चला निघूया... आनंददायी सहलींना... आयुष्याच्या आठवणी साठवायला....
#2025

वाराणसीजवळील गंगा नदीच्या काठी वसलेला, रामनगर किल्ला हा १८ व्या शतकातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. काशी नरेश, महार...
15/06/2025

वाराणसीजवळील गंगा नदीच्या काठी वसलेला, रामनगर किल्ला हा १८ व्या शतकातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. काशी नरेश, महाराजा बलवंत सिंह यांनी १७५० मध्ये या किल्ल्याची स्थापना केली होती. हा किल्ला मोगल वास्तुकला आणि भारतीय शैलीचा एक सुंदर संगम आहे.
तसेच रामनगर किल्ल्यातील संग्रहालय इतिहासप्रेमींसाठी एक अनोखा खजिना आहे! येथे तुम्हाला शाही शस्त्रे, ऐतिहासिक पोशाख, जुनी घड्याळे, आणि महाराजांच्या वैयक्तिक वस्तू पाहायला मिळतील. विशेषतः, सोन्या-चांदीच्या पालख्या आणि दुर्मिळ हस्तलिखिते खूपच आकर्षक आहेत.
रामनगर किल्ला केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर तो येथील समृद्ध संस्कृतीचा आरसा देखील आहे. येथे दरवर्षी होणारी दुर्गापूजा आणि विशेषतः रामनगरची प्रसिद्ध रामलीला (दसरा महोत्सव) पाहण्यासारखी असते. महाराजा स्वतः या उत्सवांमध्ये सहभागी होतात, ज्यामुळे त्यांना एक विशेष महत्त्व प्राप्त होते.
*रामनगर चा हा किल्ला आपण रेअर पात आयोजित वाराणसी,अयोध्या, प्रयागराज टूर मधे आवर्जून दाखवतो.
* वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत उघडा असतो (शुक्रवारी बंद).
* प्रवेश शुल्क: भारतीयांसाठी ₹५०, परदेशी नागरिकांसाठी ₹३०० (बदल असू शकतो).
* पोहोच: वाराणसी कॅंट रेल्वे स्टेशनपासून साधारण १४ किमी. ऑटो किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येते.
* टीप: गंगा नदीच्या पलीकडून किल्ल्याचे विहंगम दृश्य नक्की अनुभवा!



Address

Office No. 5, Second Floor, Vishrambag Commercial Complex, Main Road
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when RarePath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RarePath:

Share