23/12/2014
23.12.2014.
प्रिय केंद्र चालक मित्रहो,
MKCL ने पाठवलेले केंद्र नूतनीकरणाची सुधारित प्रक्रिया - दोन पर्याय हे पत्र सर्वांनी वाचले असेलच.
डीपॉझीटच्या प्रश्नाने बाधित अंदाजे 1500 केंद्रांपैकी केवळ 200 जणांनी एकत्रित आवाज उठवल्यावर लगेचच हा सकारात्मक बदल झाला आहे.
आपण सर्वजण जर एकत्र आलो तर असे अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात याची खात्री बाळगा. इथून पुढे किमान अन्याय सहन केला जाणार नाही, त्याच्या विरुद्ध आवाज उठवला जाईल याची सर्वांनी दाखल घ्यावी. प्रशिक्षण संस्थांची एक जबाबदार आणि सशक्त संघटना असण्यात कोणाचेच नुकसान नाही, MKCL चे ही नाही. पण हे समजण्यासाठी हुकुमशाही विचार बाजूला ठेऊन थोडा सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
MKCL च्या सदर पत्रामध्ये शेवटी धमकीच्या सुरामध्ये सांगितलंय की आता हा अंतिम निर्णय आहे, आणि आता जो कोणी याच्या विरुद्ध बोलेल त्या केंद्राचे विद्यार्थी रिजेक्ट केले जातील. अश्या पोकळ धमक्यांना किंमत देण्याची गरज नाही. बदल हीच शाश्वत गोष्ट आहे. आत्ता बदलाची सुरुवात झाली आहे.
सदर योजनेमधील पर्याय क्रमांक 2 नुसार एखादे केंद्र जर 3 महिन्यात रद्द झाले तर भरलेले 12000 रुपये बुडणार हे चूक आहे. अशा रद्द झालेल्या केंद्राला दर तिमाहीच्या प्रमाणात पैसे परत केले गेले पाहिजेत असा अधिक न्याय्य निर्णय MKCL ने घ्यावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
संघटनेने या आधी उपस्थित केलेले मुद्दे (1. TP हटाव, सेंटर शेअर बढाव आणि 2. मागील अनेक वर्षांचा CMF Contribution च्या 25 कोटी रुपयांचा हिशोब द्या.) सोडून दिलेले नाहीत. आपण सर्व मिळून ते पुढे नेऊ, संघर्ष करू अशी सर्वांनी खुणगाठ बांधूया. आपले विचार, सूचना, कल्पनांचे स्वागतच आहे.
धन्यवाद,
संदीप ताम्हनकर,
प्रशिक्षण संस्थांची संघटना - ATC.
9422001165.